---Advertisement---
नंदुरबार : शहरात गेल्या सप्ताहाता एका युवकाच्या हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी आदिवासी समाजातर्फे आज बुधवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, त्या मोर्चा सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. परंतु या मोर्चाला निवेदन देतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच काही टवाळखोरांकडून अचानक दगडफेड करण्यात आली. त्यामुळे पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार व अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या. यात पोलीसांसह अनेक जण जखमी झाल्याने मोर्चाला हिंसक वळण मिळाले असल्याचे दिसून आले.
नंदुरबार शहरात दि.16 सप्टेंबर रोजी युवकाची भर चौकात मारहाण व भोसकल्याने रूग्णालयात त्या युवकाचा मृत्यू झाला. या हत्येच्या निषेधार्थ आज नंदुरबारात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चात आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासह दोषींवर कठोर कारवाईची मागण्यांची घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनानंतर दगडफेक यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना मोर्चकरी शिष्टमंडळाकडून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आल्यानंतर अचानक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच शासकिय तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनांवरही टवाळखोरांकडून हल्ला करीत दगडफेकीसह जाळपोळ देखील करण्यात आली.यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान दगडफेकीमुळे दहशतीचे वातावरणामुळे परिसरात पळापळ सुरु होवून अज्ञातांकडून आवार परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. या दगडफेकीत चार चाकी, शालेय बस, मोटरसायकली वाहनांची तोडफोड झाली आहे. यामुळे अनेक वाहनांच्या काचा फुटल्या असून काही वाहनांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या दगडफेकीच्या धुमश्चक्रित पोलीस कर्मचाऱ्यांसह काही जण जखमी झाले आहेत. तर पोलीस पथकाने जमाव मोठा असल्याने दगडफेक करणाऱ्यांसह जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. यात पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्यानंतर जमावावर नियंत्रण मिळविण्यात पोलीसांना यश आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.









