---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिवसून येत आहे. अशात भुसावळ शहरातील एका मतिमंद तरुणीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, पीडित तरुणी घरात एकटी झोपलेली असताना इमू उर्फ इम्रान पिंजारी हा घरात घुसला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. दरम्यान, अचानक पीडितेचा भाऊ तेथे आल्याने आरोपीने पळ काढला. त्यानंतर पीडितेने घडलेली घटना आई व भावाला सांगितली.
त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणीसाठी तिला जळगाव येथे पाठवले. त्याचबरोबर शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी इमू उर्फ इम्रान पिंजारी याला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावून तपशील जाणून घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक डमाळे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे