फेसबुकवर ओळख, कोलकाताच्या महिलेला जळगावात बोलावलं अन्…, पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील एका पोलीस कर्मचाऱ्याने कोलकाता येथील एका महिलेवर अनेक वर्ष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नितीन सपकाळे असे संशयित आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीवरील माहितीनुसार, पीडित महिला २०१७ पासून नितीन सपकाळे याच्या संपर्कात होती. त्याने आपण अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचे आश्वासन दिले.

या आमिषावर विश्वास ठेवून महिलेने अनेकदा जळगावला प्रवास केला. या दरम्यान नितीनने तिला विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. २०२० मध्ये पीडित महिलेला नितीनच्या लग्नाबद्दल आणि त्याला मुलगी असल्याचे कळले.

मंदिरात लावले जबरदस्तीने लग्न

अखेरीस, २०२५ मध्ये नितीनने या प्रकारानंतरही नितीनने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेला फसवणे सुरूच ठेवले. २०२१ ते २०२५ या काळात त्याने वेळोवेळी अत्याचार तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतर नितीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला धमकावून एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले आणि नंतर हे लग्नच झाले नसल्याचे सांगून तिला सोडून दिले.

या फसवणुकीची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने वकिलांच्या मदतीने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपी नितीन सपकाळे, त्याची पत्नी, आई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---