Dhule Crime : दुचाकी चोरी करून निर्माण करायचे दहशत; अखेर पोलिसांनी दिला दणका

---Advertisement---

 

Dhule Crime : धुळे जिल्ह्यासह नाशिकच्या काही भागांत दुचाकी चोऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करुन, त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

दोंडाईचा परिसरात मोटारसायकल चोर सक्रिय आहेत. या माहितीच्या आधारावर, पथकाने तातडीने सापळा रचून दोंडाईचा शहरातून संशयित आरोपी मुकेश संजय पवार (वय २४, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा साथीदार अजय ऊर्फ आकाश विजय भिल (रा. निरगुडी) यास अटक केली आणि तिघांकडून शिंदखेडा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण १० मोटारसायकली पोलिसांनी केल्या.

हस्तगत ठाण्यात या कारवाईमुळे शिंदखेडा आणि चांदवड पोलीस दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---