---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहेत. अशात पुन्हा वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. दत्तू दिलेरसिंग बारेला (२१, रा. भोकर, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून दत्तू दिलेरसिंग बारेला (२१, रा. भोकर, ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २७सप्टेंबर) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दत्तू बारेला याचे आई-वडील व बहीण हे शेतात गेलेले होते. घरी एकटाच असलेला दत्तू हा वायर जोडत असताना त्याला विजेचा धक्का बसला, त्यात तो जागीच ठार झाला. त्याचे आई-वडील घरी आले त्यावेळी हा प्रकार लक्षात आला.
तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, बहीण, मोठा भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका शेतकऱ्यासह दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पुन्हा वायर जोडत असताना विजेचा धक्का लागून दत्तू दिलेरसिंग बारेला (२१, रा. भोकर, ता. जळगाव) याचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हयात हळहळ व्यक्त होत आहे.
---Advertisement---