---Advertisement---
जळगाव : अतिवृष्टीमुळे हिवरा नदीकाठावरील कृष्णापुरी भागातील मातीचे घर कोसळून ढिगाऱ्याखाली दाबून महेश नितीन राणे हा १० वर्षाचा मुलगा ठार झाला. यात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली.
सोमवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास विठ्ठल काशिनाथ पाटील यांच्या मालकीचे पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील हिवरा नदी काठावरील मातीचे राहते घराच्या मधल्या खोलीचे छत कोसळले.
यावेळी मधल्या खोलीत विठ्ठल पाटील यांची नातवंडं महेश नितीन राणे (१०) व योगेश बाळू पाटील (१४) हे दोघे झोपले होते. यावेळी छत कोसळताच त्या ढिगाऱ्याखाली हे दोघेही नातवंड दाबले गेले.
यात महेश राणे हा जागीच मरण पावला तर योगेश पाटील यास रुग्णालयात ग्रामीण उपचारार्थ करण्यात आले आहे. दाखल महेश यास मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, विठ्ठल पाटील यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांच्या मुलाचाही गेल्याच महिन्यात अपघात झाला. त्यात त्यास अपंगत्व आले. महेश याचे वडील लहानपणीच मयत झाले आहेत.
तो आजोबांकडे राहायला आला होता. त्याची आई व दोन लहान बहिणी ह्या गावी लोंढे (ता. चाळीसगाव) येथे राहत होते. शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे तहसीलदार बनसोडे यांनी सांगितले.
---Advertisement---