---Advertisement---
भुसावळ : येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ या विषयावर सलग पाचवी द्विवार्षिक राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, डॉ. विनोद चौधरी, (सी.एस.आय.आर. – आय.एम.टेक. चंदिगढ), डॉ. संजोग नगरकर (आय.आय.टी . मुंबई), डॉ. सौरभ श्रीवास्तवा (मणिपाल विद्यापीठ जयपूर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रा. जी. एच. सोनवणे (BOS चेअरमन), उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, डॉ. डी. एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. येवले, समन्वयक डॉ. सी. एच. सरोदे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. कोलते व डॉ. क्षिरसागर आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात डॉ. विनोद चौधरी, डॉ. संजोग नगरकर यांनी विविध विषयावर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. सौरभ श्रीवास्तवा यांनी माहिती दिली. यावेळी 260 पेक्षा जास्त विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक सहभागी झाले होते. तसेच 60 पेक्षा जास्त संशोधकांनी पोस्टरद्वारे त्यांचे संशोधनाचे सादरीकरण केले.
समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच. बऱ्हाटे अध्यक्षस्थानी होते. IDBI Bank, LIC of India, Bank of Maharashtra आणि आर. जी. एल. फूड्स लिमिटेड यांनी स्पॉन्सर म्हणून मदत केली. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. सी एच सरोदे यांनी केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख परिषदेचे चेअरमन डॉ. एस. डी. येवले, परिषदेचे सचिव डॉ. सचिन कोलते व डॉ. अजय क्षिरसागर, परिषदेच्या कोषाध्याक्षा डॉ. संगीता भिरूड, डॉ. विलास महिरे, डॉ. उमेश फेगडे, डॉ. नीलिमा पाटील, प्रा. तेजश्री झोपे, प्रा. धनश्री बरडे, प्रा. सागर सोनवणे, प्रा. प्रशांत पाटील तसेच रसायनशास्त्र विभागातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
---Advertisement---