सोशल मीडियावर जुळले सूत; गरबा उत्सवाची संधी साधून दोन तरुणींनी केले पलायन, एक लग्न करून परतली अन् दुसरी…

---Advertisement---

 

जळगाव : बोदवड तालुक्यातील दोन तरुणींनी नवरात्रीच्या गरबा उत्सवाची संधी साधत पलायन केल्याच्या दोन घटनांची नोंद येथील पोलिसांत करण्यात आली आहे. यापैकी एकीने लग्न करून प्रियकरासह पोलिस ठाण्यात हजेरी लावत लग्नाची माहिती दिली.

यावेळी पोलिसांनी या तरुणीच्या आई व भावाला बोलवून घेतले असता प्रियकराने उगाच काही राडा होऊ नये, यासाठी आपल्या मित्रांनाही पोलिस ठाण्याबाहेर पाळतवर ठेवले. तरुणीची आई पोलिस ठाण्यात येताच ‘मी हिला ओळखत नाही’ असे तरुणीने आईबाबत सांगितले.

क्षणभर आईनेही तिच्याकडे पाहत ‘साहेब, जर हिचे आम्ही कोणी नाही तर माझी ही कोणी नाही..’ असे सांगत जड अंत:करणाने पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला. तर शहरातील दुसऱ्या तरुणीने विदर्भातील तरुणासोबत सोशल मीडियावर सूत जुळवत नवरात्रीच्या सातव्या माळेला पलायन केले.

सकाळी मुलगी घरात दिसून न आल्याने आई-वडिलांना धक्का बसला. लोकेशनवरून ती आदल्या रात्री फोनवरून बोलून घरातून पळून गेली, हे स्पष्ट झाले. नातलग तिच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---