तळोद्यातील मानवी वस्तीजवळ बिबट्याची दहशत; पकडण्याची मोहीम अयशस्वी, नागरिक हतबल

---Advertisement---

 

तळोदा : शहरात बिबट्याने पुन्हा एकदा दहशतीचा कहर घडवला असून, अवघ्या 500 मीटरच्या परिसरात तिसऱ्यांदा शिकार करत वनविभागाच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवले आहे.

तळोदा शहराजवळील भारत ऑईल मिलच्या पुढे जगन्नाथ माळी यांच्या शेताच्या खुल्या पटांगणात मुन्ना रविंद्र वळवी यांचा घोड्याचा १ सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने फडशा पाडत वनविभागाच्या हालचालींना खुले आव्हान दिले आहे.

तळोदा शहरालगतच्या भारत ऑईल मिल परिसरात पहिली शिकार, त्यानंतर पाडवी गल्लीजवळ गायीला भक्ष्य, आणि आता पिंजऱ्याजवळच 200मीटरवर घोड्याची उघडपणे शिकार हे सगळं वनविभागाच्या निष्क्रियतेची थट्टा करत असल्याचे चित्र आहे.

पिंजरा लावून १५-२० दिवस उलटले, पण बिबट्या जेरबंद होतच नाहीये, तो अजून बिनधास्त फिरत लोकांच्या जीवावर आणि जनावरांवर तुटून पडतोय.


या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं आणि रोषाचं वातावरण आहे. नागरी वस्तीजवळ वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे शहरवासीय भयभीत झाले आहेत.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---