---Advertisement---
जळगाव : घराच्या बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमधून प्रणाली किरण बारी (२९, रा. दीक्षितवाडी) यांची सात तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणाली बारी या रात्री देवीच्या आरतीसाठी जाताना सोन्याची पोत घालन गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्यांनी ती मंगलपोत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवली. कपाटाचे लाकडी ड्रॉवर खाली पडले. यावेळी त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेली मंगलपोत दिसली नाही.
सासरी गेलेल्या युवकाची आत्महत्या
रावेर : विवरे बुद्रूक येथील अफजल रमा तडवी (वय २१) याने भोकरी येथे सासरी असताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवून अजंदे रस्त्यावरील केळीच्या बागेतील रामफळाच्या फांदीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.
अफजल हा पत्नी सानिया सोबत सासरी २९ रोजी गेला होता. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी त्याने त्याच्या मोबाईलवर ‘आज मी आत्महत्या करीत आहे व त्यास मी स्वतःच जबाबदार राहील.’ असा संदेश देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी ४: २५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
---Advertisement---