---Advertisement---
जळगाव : ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (२७) या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (२७, रा. कासमवाडी, जळगाव) असे अटक संशयित आरोपीचे नाव आहे.
शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (२७) या तरुणावर दोन तरुणांनी धारधार शस्त्राने तीन वार केले.
---Advertisement---
या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर वार झाल्याने त्याचे मूत्रपिंड फाटले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींचा तपास सुरु केला होता. अखेर अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयित आरोपीआला नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली आहे.
---Advertisement---