---Advertisement---
जळगाव : सोन्याचे दागिने घडविणाऱ्या एका कारागीराने ज्वेलरीमधून सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोने लुटले. शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स येथे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तक्रारीनुसार बिस्वजीत बनेस्वर सासमल ( सोने कारागीर, हमु रिधुरवाडा, मुळ रा. वार्ड नं. १० जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याच्या विरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तीन लाख ७२ हजार किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचा एक तुकडा, पाच लाख १८ हजार किमतीचे अंदाजे ४७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख ९८ हजार किमतीचे अंदाजे २७ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख १० हजार किमतीचे अंदाजे १९ ग्रॅम वजनाची २२ कॅरेटची सोन्याची लगड असा सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संशयिताने लंपास केला. उपनिरीक्षक योगेश ढिकले हे तपास करीत आहेत.
बसमध्ये चढताना महिलेची पोत लंपास
जळगाव : बसमध्ये चढताना प्रवासींनी गर्दी केली. याचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरुन नेली. शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना नवीन बसस्थानकावर घडली.
सुनिता नारायण चौधरी (वय ४०, रा. नशिराबाद) या बेटावद येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर शिंदखेडा बसची प्रतिक्षा करत थांबल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव शिंदखेडा (एमएच १४ बीटी १८५४) आगारात लागली. प्रवासींची बसमध्ये चढण्यासाठी गर्दी झाली.
महिला बस चढली. त्यानंतर त्यांनी पोतला हात लावुन पाहिले दिसली. महिलेने तत्काळ बस तसेच बाहेर शोध घेतला असता मंगलपोत आढळुन आली नाही. सोन्याचे मंगळसुत्र, त्यात दोन वाटी तीन ग्रॅम वजनाचे व एक ग्रॅम वजनाचे मनी चोरी प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सणासुदीचा घेताहेत फायदा
सणानिमित्त बसमध्ये लोकांची गर्दी वाढत आहे. या संधीचा पुरेपुर फायदा चोरटे घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून नवीन बसस्थानकावर मोबाईल, मंगलपोत तसेच पाकीटमार अशा घटना वाढल्याचे दिसुन येत आहे. भुरट्या चोरट्यांच्या कारवायांनी प्रवाश्यांना मनस्ताप होत असल्याचे आजच्या घटनेनंतर काही प्रवाश्यांनी सांगितले.









