धक्कादायक! ‘स्मशानातील सोन्या’च्या हव्यासापोटी अस्थीची चोरी, जळगावातील प्रकार

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांकडून महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला होता. मयत छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते.

मात्र, याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांकडून महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसला तरी, चोरट्यांचा शोध घेणे ही पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे. दरम्यान, पाटील कुटुंबीयांनी “सोनं नको, फक्त आमच्या आईची अस्थी परत करा,” अशी भावनिक मागणी केली आहे.

आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर ओढले ताशेरे


आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवर ताशेरे ओढले असून, मेलेल्या नागरिकांचीही अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---