---Advertisement---
Cabinet meeting : राज्यभरात सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशात आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. यात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली आहे.
अर्थात एकूण राज्य सरकारच्या वतीने 31628 कोटींचे पॅकेज देत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणाला किती मदत ?
मृतांच्या कुटुंबीयांना : प्रत्येक कुटुंबाला 4 लाख रुपये. जखमी व्यक्तींना : 74,000 ते 2.5 लाख रुपये. घरगुती वस्तू, भांडी, कपड्यांचे नुकसान : प्रत्येक कुटुंबाला 5,000 रुपये. दुकानदार आणि टपरीधारक: 50,000 रुपये. डोंगरी भागातील घरांचे नुकसान : पक्की घरे पूर्ण नष्ट झाल्यास: 1,20,000 रुपये. कच्ची घरे पूर्ण नष्ट झाल्यास: 1,30,000 रुपये. अंशतः नुकसान झाल्यास: 6,500 रुपये. झोपड्यांचे नुकसान: 8,000 रुपये. जनावरांचे गोठे: 3,000 रुपये. जनावरांचे नुकसान:दुधाळ जनावरे: 37,500 रुपये. ओढकाम करणारी जनावरे: 32,000 रुपये. कुक्कुटपालन: प्रति कोंबडी 100 रुपये. शेतीचे नुकसान: राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) निकषांनुसार 2 हेक्टरपर्यंत मदत मिळते, पण आता 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल. यासाठी 10,000 कोटी रुपये अतिरिक्त निधी उपलब्ध करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. खरडलेली जमीन: प्रति हेक्टर 47,000 रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपये. खचलेली किंवा खराब झालेली विहीर: 30,000 रुपये. तातडीची मदत: 1,500 कोटी रुपये जिल्हा नियोजन समिती (DPDC) मार्फत राखीव. शेतकऱ्यांना थेट मदत: प्रति हेक्टर 48,000 रुपये. पीकविमा: सुमारे 5,000 कोटी रुपये.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणीस म्हणाले की, शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लोक मदत करतायत. अनेक गोष्टी नियमांमध्ये कव्हर करता येत नाहीत. त्यावर सुद्धा सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईस, असा प्रयत्न आहे.









