Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

---Advertisement---

 

Girish Mahajan : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभराच्या पगाराचा धनादेश ₹31,18,286 सुपूर्द केला आहे.


ही रक्कम राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेच्या मदतीसाठी समर्पित केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शक्य ती मदत करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.

सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, नागरिक म्हणून आपणदेखील पुढे येऊन हातभार लावणे गरजेचे आहे. माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे. अश्या भावना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी सदस्य उपस्थित होते. मंत्री महाजन यांच्या या निर्णयाचे जामनेरात तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व जनतेकडून स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---