पैशांसाठी सतत तगादा; भाग्यश्री त्रास सहन करत राहिली, पण… माहेरच्यांचा आक्रोश पाहून जामनेर सुन्न

---Advertisement---

 

जळगाव : ‘वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरवरुन २० लाख रुपये हुंड्याच्या स्वरूपात घेऊन ये’ असे म्हणत भाग्यश्रीचा छळ केला जात होता. शेवटी त्यांनी तिला मारून टाकल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. भाग्यश्री राहुल परदेशी (२८) असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली आहे.

जामनेर तालुक्यातील जंगीपूरा येथे ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहितेच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपानुसार, वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेरवरुन २० लाख रुपये हुंड्याच्या स्वरूपात घेऊन ये’ असे म्हणत भाग्यश्रीचा छळ केला जात होता.

भाग्यश्री हा त्रास सहन करत राहिली. मात्र, त्यांची मागणी पूर्ण होत नसल्याने पती राहुल परदेशीसह सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत व दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने भाग्यश्रीला गळफास देऊन तिला जीवे मारून टाकल्याची फिर्याद विवाहितेचे वडील सरदार बाबुलाल परदेशी यांनी दिली आहे.

घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांच्यासह पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली. या प्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पती राहुल राजपूत व सासू रेखा राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---