चिंताजनक! जळगाव जिल्ह्यात आणखी एकाचा खून, ओव्हरटेकवरुन पाच जणांनी दोघांवर केला चाकू हल्ला

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात दर पाच दिवसाला एक खून होत असल्याचे भयानक चित्र दिसून येत आहे. अशात आणखी एका तरुणाचा चार ते पाच जणांनी चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश गजानन झाल्टे (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील तरुणाचा चार ते पाच जणांनी चाकूने वार करीत खून केला. ही घटना मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर जवळील नरवेल म्हैसवाडी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी घडली. सतीश गजानन झाल्टे (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तो आणि अभिषेक जितेंद्र झाल्टे (१९) असे दोन जण मलकापूर येथून पिंप्राळा येथे येत होते. रस्त्यात ओव्हरटेक केल्याच्या कारणावरुन चार ते पाच जणांनी दोघांवर चाकू हल्ला केला. त्यात सतीश हा ठार झाला तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

ऊसतोड मजूराचा अपघातात मृत्यू

जामनेर : निमखेडी (ता. मुक्ताईनगर) येथील ऊसतोड मजूर आत्माराम रमेश भिलाला (२७) यांच्या दुचाकीला जामनेर-पहूर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री अपघात झाल्याची घटना घडली. यात आत्माराम हे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी युवकांसह पोलिसांनी मदतकार्य केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---