---Advertisement---
जळगाव : राज्यातून मान्सून जवळ-जवळ परतल्यामुळे जळगाव जिल्ह्याचे हवामान सध्या कोरडे झाले आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील उकाडा कमी झाल्याचे चित्र आहे. याचसोबत रात्रीच्या तापमानातही मोठी घट नोंदवली जात आहे.
एकीकडे मान्सून परतला असला तरी, आगामी आठवड्यात ऐन दिवाळीच्या काळात जिल्ह्यात काही अंशी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १६ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते.
दुसरीकडे, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्याभरात रात्रीच्या तापमानात ८ अंशांनी घट झाली असून, रविवारी जळगाव शहरातील रात्रीचा पारा १६ अंशांपर्यंत खाली घसरला आहे.
आगामी पाच दिवसांमधील स्थिती…
दिनांक रात्रीचा पारा वातावरणाची स्थिती
१३ ऑक्टोबर-१६ अंश – कोरडे वातावरण राहणार
१४ ऑक्टोबर -१७ अंश -कोरडे वातावरण राहणार
१५ ऑक्टोबर -१७ अंश -काही अंशी ढगाळ
१६ ऑक्टोबर -१८ अंश- पावसाची शक्यता
१७ ऑक्टोबर -१८ अंश- मध्यम ते हलका पाऊस