---Advertisement---
जामनेर : जामनेर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत आज (दि. १३) तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोडत कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तहसील कार्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी सुरू झाली. पारदर्शक पद्धतीने लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
या सोडतीनंतर जामनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष व उमेदवार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आतापर्यंत पंचायत समितीत सात महिलांना सभापती होण्याची संधी मिळाली असून आता पुन्हा महिलेलास हा मान मिळणार आहे.
आरक्षण पुढीलप्रमाणे :
