दुर्दैवी! पंक्चर ट्रकवर आदळला दुसरा ट्रक, दोन जण ठार

---Advertisement---

 

जळगाव : पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बायपास रस्त्याजवळ १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात घडला. प्लायवूडने भरलेला एक ट्रक पंक्चर झाल्याने चालक आणि त्याचे साथीदार टायर काढण्याचे काम करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १च्या सुमारास गुजरातहून वाशिम येथे प्लायवूड घेऊन जाणारा चौदा चाकी ट्रक (जीजे१२/बीएक्स९३३२) पारोळा येथील बायपासजवळ आला असता त्याचे टायर पंक्चर झाले. त्यामुळे ट्रकचा चालक व त्याचा साथीदार टायर काढण्याचे काम करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

पंक्चर टायर काढण्याचे काम सुरु असताना दुसऱ्या ट्रकने (एमएच३४/सीके०७१७) भरधाव वेगात येऊन त्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत विभाभाई करसन रबारी (६२, धानेटी, ता. कचभुज, जि. कच्छ, गुजरात) व धडक देणाऱ्या ट्रकवरील वीरेंद्र पतितपावन खोब्रांगडे (५२, भद्रावती, जि. चंद्रपूर) या दोघांचा मृत्यू झाला.

वालजीभाई लक्ष्मणभाई (धानेटी, ता. कचभुज, जि. कच्छ) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत वालजीभाई लक्ष्मणभाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---