---Advertisement---
पारोळा : एका हॉटेलवर पत्ता जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे धाड टाकून जवळपास १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वरील तालुक्यातील दळवेल गावाजवळ एका बंदिस्त जागेत जुगार सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विजय भोंबे, पोउनि अमोल दुकळे, हवालदार सुनील हटकर, अनिल राठोड, अरूण बागुल, कैलास साळुंखे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास त्या ठिकाणी अचानक धाड टाकली.
या धाडीत दत्तात्रेय उर्फ गोरख धोबी, विशाल शिंदे, कैलास खाडे, लक्ष्मण भोई, संतोष महाजन व जावेद शेख कादर (पारोळा), महेंद्र म्हसदे (मालेगाव), ज्ञानेश्वर पाटील (शिवरे, ता. पारोळा) हे पत्ता जुगार खेळताना व खेळवताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठजणांवर कारवाई केली आहे.