---Advertisement---
Jalgaon Weather Update : जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होऊन गारठा जाणवत असतानाच, वातावरणात अचानक बदल झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, त्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होऊन गारठा जाणवत असतानाच, वातावरणात अचानक बदल झालेला पाहायला मिळत आहे. बुधवारी जळगाव शहर व जिल्ह्यात सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तसेच कमाल व किमान तापमानातही वाढ नोंदवली गेली.
या बदलत्या हवामानामुळे गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, त्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात पुन्हा कोरडे हवामान तयार होईल. मात्र, त्यानंतर २२ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलांची नोंद घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करत असला तरी, दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनला सुरुवात झाली आहे. या ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे मध्य व उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. यामुळे पाऊस येऊ शकतो.