दुर्दैवी! मित्रांसोबत पोहायला गेला अन् नियतीने साधला डाव, शिरसोलीत घटनेनं हळहळ

---Advertisement---

 

जळगाव : शिरसोली येथील नेवरे परिसरातील धरणामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ऑक्टोबर रोजी सकाळी १५ १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

शरद राजाराम सुने (बारी, वय ३१, रा.शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सकाळी तो भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) यांच्यासोबत नेवरे शिवारातील धरणात पोहण्यासाठी गेला होता.

धरणात पोहत असताना शरदला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुड्डू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी घाबरून गावाकडे धाव घेतली आणि पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच, ग्रामस्थ तत्काळ धरणाकडे आले. पट्टीच्या व पोहणाऱ्यांच्या मदतीने शरद सुने याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्या अवस्थेतील शरद सुने याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.

या घटनेमुळे शरद सुने यांच्या परिवाराने, तसेच मित्रांनी मोठा आक्रोश केला. मजुरी करून कुटुंबाला आधार देणारा एकुलता एक मुलगा गेल्याने शिरसोली गावावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---