सावधान! सायबर भामटे लढवताय नवनवीन शक्कल, अनोळखी लिंक अन् दीड कोटींची फसवणूक

---Advertisement---

 

नंदुरबार : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले असून यात सामान्य नागरिक देखील फसविला जात आहे. सायबर भामटे विविध क्लृप्त्या त्यासाठी वापरत आहेत. सामान्य माणसांची फसवणूक टळावी आणि सायबर क्राइमबाबत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलिसांतर्फे सायबर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून विशेष मोहीम आखण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी गुरुवारी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात वर्षभरात एक कोटी ४३ लाख ९९ हजार रुपयांची सायबर फसवणूक झाली असून त्यातील ३४ लाख ३७ हजार रुपयांची वसुली केली गेली असल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अज्ञात लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नये. बँक खाते, ओटीपी, डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक कोणालाही देऊ नये. केवळ मान्यताप्राप्त व अधिकृत अॅप्सचा वापर करावा, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करण्याचे टाळावे, फसवणूक झाल्यास त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० किंवा www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अनोळखी लिंक, अॅप डाऊनलोड करताना घाई करू नका…


सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढत चाललेली फसव फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यभरात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलिसांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून विशेष मोहीम सुरू करीत असून शाळा, महाविद्यालये, तसेच विविध वसाहतींमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना अज्ञात क्रमांकावरून येणारे कॉल, संशयास्पद लिंक, अॅप डाउनलोड आणि बँक संबंधित माहिती विचारणाऱ्या संदेशांपासून सावध राहणे आवश्यक आहे. गुन्हेगार विविध प्रकारे लोकांना जाळ्यात ओढतात. त्यामुळे जनतेत सतर्कता आणि स्वसंरक्षणाची सवय होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---