बेपत्ता 11 व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना यश, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून वेगवगळ्या तालुक्यातून तब्बल ११ जण बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्या त्या पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात हे सर्व व्यक्ती मिळुन आले आहेत.

कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलवून या बेपत्ता व्यक्ती त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अचानक बेपत्ता झालेल्या या व्यक्ती सुखरुप घरी परतल्याच्या सुखद घटनेने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसले. परिवारातील सदस्यांनी याबद्दल पोलिसांचे आभारही मानले.

२८ वर्षीय महिला ४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती. ४५ वर्षीय गृहस्थ २३ एप्रिल रोजी बेपत्ता झाले होते. यासंदर्भात निंभोरा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल होती. २३ वर्षीय तरुण ८ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता. ३८ वर्षीय महिला २१ सप्टेंबरला बेपत्ता झाली होती. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्या होत्या. ३३ वर्षीय तरुण ७ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात ही मिसिंग दाखल केली होती.

२८ वर्षीय तरुण २४ ऑगस्ट २०२४ रोजी बेपत्ता झाला होता. पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात यासंदर्भात मिसिंग दाखल होती. २१ वर्षीय तरुणी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी बेपत्ता झाली. अमळनेर पोलीस ठाण्यात ही मिसिंग दाखल होती. १८ वर्षीय तरुणी १० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. ही मिसिंग चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

घराबाहेर पडलेला तरुण ९ ऑक्टोबरला तर दुसरा एक तरुण ८ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला. घराबाहेर पडलेली तरुणी ९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. या तिघांच्या प्रकरणी तक्रारीनुसार धरणगाव पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. असे वेगवगळ्या तालुक्यातून तब्बल ११ जण बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्या त्या पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात हे सर्व व्यक्ती मिळुन आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---