कर्जबाजारीपणामुळे ३५ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, जामनेर तालुक्यातील घटना

---Advertisement---

 

जामनेर : तालुक्यातील भागदरा गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली असून प्रकाश नामदेव कांबळे (३५ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश प्रकाश कांबळे हा तरुण काही दिवसांपासून घरगुती वाद आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने काल रात्री विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला जळगाव येथे तातडीने जिल्हा रुग्णाल यात दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण भागदरा गावात शोक कळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, कर्जाच्या ओझ्याने आणखी एक संसार उजाडला अशा शब्दात ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.

ग्रामीण भागात वाढती आर्थिक अडचण, शेती, व्यवसायात होणारे मोठे नुकसान तसेच घरगुती कलह या कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाणात मोठी वाढ होत असून आर्थिक तणावातही उपाय आहे त्यासाठी आत्महत्या हा उपाय नाही अशा भावना या प्रसंगी नागरिक व्यक्त करीत होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---