---Advertisement---
धुळे : साक्री तालुक्यातील ककाणी गावात दिवाळीच्या तोंडावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. बकरींसाठी चारा आणायला गेलेले मोटर वाइंडिंग कारागीर दादाजी रामजी देसले (वय ६१) यांचे सर्पदंशाने निधन झाले. देसले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शनिवारी चारा काढताना पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. सोमवारी देसले यांच्या पायाला सूज वाढली आणि त्यांची प्राणज्योत मालावली. रविवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देसले हे मूळचे मालेगाव तालुक्यातील गारेगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे.
पाय घसरून पडून प्रौढाचा मृत्यू
धुळे : तालुक्यातील वरखेडीतील पिरन गुलाब पिंजारी (वय ५८) हे दि. १८ रोजी कान्हा रेजन्सी कामास गेले असतापाय घसरून खाली पडल्याने अत्यव्यस्थ अवस्थेत परिस्थितीत उपचारार्थ येथील हिरे वैद्यकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉ. अरूणकुमार नागे यांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. याप्रकरणी मोहाडीनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास. पोहेकॉ. जगदीश पाटील करीत आहेत.