खुशखबर! भुसावळ विभागातून धावणार १३ विशेष रेल्वे, जाणून घ्या कधी?

---Advertisement---

 

जळगाव : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेने उद्या, ३० ऑक्टोबर रोजी एकूण २५ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी १३ गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये ०१०११ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर विशेष, ०१०३१ मुंबई-बनारस विशेष, ०१०४७ मुंबई- दानापूर विशेष, ०१०७९ मुंबई-गोरखपूर विशेष, ०२१३९ एलटीटी-नागपूर विशेष, ०११४३ एलटीटी-दानापूर विशेष, ०१०५१ एलटीटी-बनारस विशेष आणि ०३३८० एलटीटी-धनबाद विशेष या गाड्यांचा समावेश आहे.

या गाड्या भुसावळ, जळगाव, मलकापूर, शेगाव, अकोला आदी स्थानकांवर थांबतील. पुणे विभागातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष, ०१४४९ पुणे-दानापूर विशेष, ०१४०१ पुणे-नागपूर विशेष आणि ०१९२५ हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी विशेष या गाड्या भुसावळ विभागातून मार्गक्रमण करणार आहेत. याशिवाय नागपूरहून सुटणारी ०१४१० नागपूर-पुणे विशेष गाडीदेखील भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड येथे थांबतील.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---