---Advertisement---
जळगाव : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली आहे.
सुनील धोबी याने तक्रारदाराची लिंबाची झाडे तोडून भरलेला ट्रक बेकायदेशीर लाकूड वाहतूक केल्यामुळे पकडला होता. तो ट्रक सोडवण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
तडजोडीअंती एक लाख रुपये लाचेची रक्कम ठरली. याबाबत आरोपींनी तक्रारदारांसोबत तडजोड झालेली रक्कम मान्य असल्याची कबुली दिली. त्यावरून पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.









