दुर्दैवी! रस्त्यातच अनर्थ घडला; महिलेचा हृदयद्रावक अंत, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

---Advertisement---

 

Snehal Gujarati Accident : कुटुंबासह गावाच्या दिशेने निघालेल्या ४३ वर्षीय महिलेचा नियतीच्या खेळीने रस्त्यातच अंत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहे.

सूत्रानुसार, स्नेहल गुजराती (43) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या कुटुंबासह पुण्याहून मानगावकडे जात होत्या. दरम्यान, त्यांची कार ताम्हिणी घाटातील वळणावर असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरड इतकी अचानक कोसळली की, गाडीमधील लोकांना सावरता देखील आलं नाही.

दरड थेट कारवरून स्नेहल गुजराती यांच्या डोक्यावर कोसळली. परिसरातील नागरिकांनी तातडीने स्नेहल गुजराती यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत्यू घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहे. अर्थात घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी नेमकं कोण जबाबदार?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरड रोखण्यासाठी उपाययोजना करा


दरम्यान, ताम्हिणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना नेहमीच्याच असून, दरड रोखण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---