जळगाव जिल्हा कारागृहात पुन्हा बंदीवर जीवघेणा हल्ला, काय आहे कारण?

---Advertisement---

 

जळगाव : जिल्हा कारागृहात पुन्हा एका बंदीवर 4 बंदींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी कारागृहातील शिपायांनी धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून बंदीला सोडवत जिल्हा रुग्णालयात हलवले आहे, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चार बंदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस सोनवणे असे हल्ला करण्यात आलेल्या बंदीचे नाव आहे. तेजस सोनवणे हे जिल्हा कारागृहात झोपलेले असताना 4 बंदींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला जुन्या रागातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी कारागृहातील शिपायांनी धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून बंदीला सोडवत जिल्हा रुग्णालयात हलवले आहे, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पराग आरखे , बबलू उर्फ विशाल गागले, भूषण माळी व सचिन चव्हाण या हल्लेखोर बंदींवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्येही घडली होती घटना

एका बंदीला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बरॅकच्या दरवाजावर आदळत मारहाण केल्याची २७ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली असून, यावेळी कारागृहातील शिपायांनी धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून बंदीला सोडवत जिल्हा रुग्णालयात हलवले आहे, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चार बंदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---