‘अवैध धंदे बंद करा’, भुसावळमध्ये ‘एडीजीपी’च्या गाडीसमोर आंदोलन

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक नवल बजाज हे आज येथे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाजाच्या तपासणी संदर्भात भुसावळ आले होते. यावेळी ‘अवैध धंदे बंद करा’ अशी मागणी करत काहींनी नवल बजाज यांच्या गाडीसमोर आंदोलन केले.

शहरातील सर्वच भागात सट्टा मटका आणि इतर जुगाराचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळलेले असून यातून गरीब कामगार आणि मजूर वर्गाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप ॲड. हर्षल सावकारे आणि मयुर सावकारे यांनी केला.

विशेष म्हणजे बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये तर बिनबोभाटपणे बाजारपेठ पोलिसांच्या आशीर्वादानेच सट्टा मटका जुगार सुरू असून, यातून पोलिसांना दरमहा लाखो रूपयांची वरकमाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले एडीजीपी ?

जळगाव जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमधून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची याकामी निवड करण्यात आली होती. मी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कामकाजा संदर्भात समाधानी आहे.

वाढती गुन्हेगारी आहेच, मात्र लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात कर्मचारी संख्या वाढलेली नाही. कर्मचारी संख्या वाढण्यासाठी व नवीन भरती होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---