---Advertisement---
अडावद, ता. चोपडा : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत आज (शुक्रवार) अडावदकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये उत्साहाने धावले.
पोलीस प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज अडावद पोलीस स्टेशन ते यावल रोड वरील पाटचारी पावेतो एकता दौड झाली. अडावदकरांकडून या ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अडावद पोलीस स्टेशन ते यावल रोड वरील पाटचारी पावेतो एकता दौड आयोजित करण्यात आली. यावेळी सरपंच बबनखा तडवी, संदीप महाजन, प्रेमराज पवार, पी. आर. माळी, डॉ. पवन सुशिर, उमेश कासट, कबिरोद्दीन शेख, शकिलोद्दीन शेख, एस. जी. महाजन, देविदास महाजन, संजय शेलकर, प्रवीण महाजन, पिंटू धनगर, उमेश बारी, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यांचा होता सहभाग
पोलीस ठाण्याचे शरीफ तडवी, शेषराव तोरे, किरण शिरसाठ, जितेंद्र सोनवणे, विजय बच्छाव, भूषण चव्हाण, जयदीप राजपूत, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी व अंमलदार, आशा वर्कर, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय, शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार, वकील, तरुण मित्र परिवार, पोलीस पाटील, होमगार्ड, भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, असे शेकडो नागरीक सहभागी झाले होते.









