पत्नीच्या औषधोपचारासाठी उपलब्ध होत नव्हते पैसे; पतीने उचलले धक्कादायक पाऊल, जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. नैराश्यातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. एरंडोलच्या भातखेडा येथे ही घडली असून, या दुर्दैवी घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ३४ वर्षीय मलक्ष्मण चिंतामण भिल असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

लक्ष्मण भिल हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि मजुरांना काम बंद पडले.

घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. एकीकडे लोकांकडून घेतलेल्या उसनवारीचे पैसे फेडण्याची चिंता, तर दुसरीकडे घरखर्च आणि पत्नीच्या आजारपणाचे ओझे, या सर्व तणावात लक्ष्मण भिल काही दिवसांपासून मानसिक तणावात होते.

त्यांची पत्नी लताबाई या आजारी असल्याने उपचारासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्या आई-वडिलांकडे दोन्ही मुलांसह माहेरी गेल्या होत्या. घरात एकटे राहिलेल्या लक्ष्मण भिल यांनी अखेर दि. १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पंख्याला दोरी लावून गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना रविवारी सकाळी आईला कळली, तेव्हा आईने एकच हंबरडा फोडला. पोलिस पाटील रेखा पाटील यांनी कासोदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. लक्ष्मण भिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---