प्रेमसंबंध असल्याचा खोटा बनाव, तरुणीचा संसार थाटण्याआधीच उद्ध्वस्त; पित्याचं धक्कादायक पाऊल

---Advertisement---

 

धुळे : साक्री तालुक्यातील एका गावात एका तरूणाने केलेल्या बदनामीमुळे मुलीचे लग्न मोडल्याने निराश झालेल्या पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आली आहे.

संशयित तरुणाने संबंधित तरुणीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचा खोटा बनाव सोशल मीडियावर केला होता. यातून तरुणीचा संसार थाटण्याआधीच उद्ध्वस्त झाला. याप्रकरणी साक्री पोलिसात संबंधित तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयित तरुणाने प्रथम येथील बसस्थानकावर तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. संशयिताने तरुणीचे लग्न जमवून देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या मोबाइलवर ती आपली प्रेयसी असल्याचे भासवून तरुणीची बदनामी केली.

संशयिताच्या या कृत्यामुळे तरुणीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रकारामुळे नैराश्यातून तरुणीच्या वडिलांनी गावातील विहिरीत उडी घेत आत्महत्या होती. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून साक्री पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---