महिलांनो, सावधान! जळगावात चेन स्नॅचिंगच्या घटनेत वाढ, जाणून घ्या घरी जाणाऱ्या आजीसोबत नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे असोत वा उपनगरांमधील रस्ते, सर्वत्र सोनपोत लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात आहे. आता अशात पुन्हा एक घटना समोर आली असून, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिवशक्ती नगर येथे उषाबाई देविदास बोरसे (वय ५४) या नातीसोबत रात्री ९ वाजून १० मिनिटांनी चालत घरी परत येत होत्या. याचवेळी, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना अडवले. त्यांनी उषाबाईच्या गळ्यातील १ लाख २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र आणि पदक बळजबरीने ओढून तोडले आणि क्षणात तिथून पळ काढला.

या घटनेनंतर उषाबाई बोरसे यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज अजबराव पाटील हे पुढील तपास करत आहेत.

चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक गर्दीची ठिकाणे असोत वा उपनगरांमधील रस्ते, सर्वत्र सोनपोत लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात आहे आणि दुचाकीवर येऊन अशा चोऱ्या केल्या जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---