प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या अतिक्रमण इमारतीवर चालणार हातोडा

---Advertisement---

 

जामनेर : तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेला वारंवार संधी देऊनही आवश्यक कागदपत्रांसह दस्तऐवज सादर न करण्यामुळे या संस्थेच्या अतिक्रमित इमारतीचे बांधकाम सोमवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाडण्याचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिले आहेत.

या संदर्भात ललित मदनलाल लोढा यांनी तक्रार दाखल केली होती. जैन संस्थेचे पळासखेडे बुद्रुक येथील गट नंबर 82 मधील ७.०६ आर (70हजार600 चौ .मी.) क्षेत्राच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्या चे तक्रारीत नमूद केले होते. त्याअनुषंगाने चौकशी समिती गठीत करण्यात आली होती ज ळगाव प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीत जामनेर चे तहसीलदार ,नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक ,सां बा विभागाचे कार्यकारी अभियंता,आणि महसूल विभागाचे नायब तहसीदारांचा समावेश या समितीत होता.

या समितीने निरीक्षण स्थळाची प्रत्यक्ष पाहणे केली त्यानंतर 14 जुलै रोजी बांधकाम परवानग्यांसह आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचे आदेश या संस्थेला देण्यात आले होते. मात्र कुठलेही कागदपत्र सादर न केल्याने या समितीने पुन्हा निरीक्षण स्थळ पाहणी केली त्यानंतर नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाने केलेल्या बांधकामाच्या मोजणीचा अहवाल सादर केला.

या अहवालानुसार प्रांताधिकारी गोसावी यांनी या बांधकामास अवैध ठरविले आहे म्हणुन महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 53मधील तरतुदीनुसार 07.06आर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम दिनांक 11 रोजी काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सां .बा. विभागाला बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी पोलिसांना पुरेसा बंदोबस्त पुरविण्याचे आणि जैन संस्थेला या कारवाईसाठी लागणारा सर्व खर्च करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार सोमवारी कारवाई केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---