---Advertisement---
जळगाव : शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देतो, असे सांगत संशयितांनी जळगाव येथील दोन जणांना नऊ लाख ९६ हजार ८५० रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी धर्मा सेक्युरीटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोघांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
४३ वर्षीय शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहेत. फिर्निचरचे काम करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर दरम्यान तक्रारदार यांच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर धर्मा सेक्युरीटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सेक्रेटरी आचल तसेच कंपनीचा ब्रोकर राघवसिंग राठोड यांनी संपर्क साधला.
शेअर्स ट्रेडिंग संबंधी रक्कम गुंतवणूक करणेकामी संशयितांनी नेक्सट्रेड या नावाचे अॅप डाउनलोड केले. त्यानंतर धर्मा सेक्युरीटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सेक्रेटरी आचल यांनी तसेच कंपनीचा ब्रोकर राघवसिंग राठोड या संशयितांनी त्यांच्या व्हाट्सअप मोबाईलवरुन तक्रारदार यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन केले.
या शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवुन देतो, असा दोघा संशयितांनी बनाव केला. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून चार लाख ६१ हजार ८५० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन स्विकारले. त्यानंतर तक्रारदार यांना नफा दिलाच नाही. परंतु मुळ रक्कमही हडप केली. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवारी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आमिषातून मॅकेनिकलची फसवणूक
४९ वर्षीय गृहस्थ एमआयडीसी वास्तव्य परिसरात कुटुंबासह करतात. ते गॅरेजवर मॅकनिकल म्हणून कार्यरत आहेत. २० सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्याशी धर्मा सेक्युरीटीज प्रायव्हेट लिमि टेड कंपनीच्या सेक्रेटरी आचल तसेच कंपनीचा ब्रोकर राघवसिंग राठोड यांनी मोबाईलवर संपर्क साधला.
त्यांनाही शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा मि ळवून देण्याचा खोटा बनाव केला. त्यांचा व्हाट्सअप मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपला जॉईन केला. त्यांना आमिषाच्या जाळ्यात घेत त्यांच्याकडून ५ लाख ३५ हजाराची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन व रोख रक्कम बँकेत जाऊन संशयितांनी त्यांच्या खात्यात स्विकारली.
तक्रारदार यांना मुळ रक्कम अथवा नफा असा कोणताही रक्कमेचा परतावा संशयितांनी केला नाही. याप्रकरणी तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.









