---Advertisement---
धुळे : अल्पवयीन मुलीचे गावातील एका मुलासोबत लग्न होणार होते. परंतु, दोघेही अल्पवयीन असल्याने विवाहाला अजून वेळ होता, मात्र लग्नाआधीच ती गर्भवती झाली. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलावर पोस्को गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शिंदखेडा तालुक्यातील एका गावात हा प्रकार समोर आला आहे. एका १४ वर्षीय मुलाचा विवाह त्याच गावातील १६ वर्षीय मुलीशी लग्न होणार होता. दोघेही अल्पवयीन असल्याने विवाहाला अजून वेळ होता. हा प्रकार १ फेब्रुवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घडला.
लैंगिक संबंधातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिने १५ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. माता अल्पवयीन असल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाने ही माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. दरम्यान, दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलावर पोस्को गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.








