सासरच्यांकडून सतत छळ, तरीही सहन करत राहिली विवाहिता, पण शेवटी ज्याची भीती तेच घडलं…

---Advertisement---

 


धुळे : सासरच्या त्रासाला कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने आपल्या पाच वर्षीय मुलगी आणि तीन वर्षाच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना निकुंभे शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी सासरच्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायत्री आनंदा पाटील (२७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, निकुंभे येथील रहिवासी असलेल्या गायत्री या सासू सासरच्या जाचाला कंटाळल्या होत्या. यामुळे त्यांनी रात्री पाच वर्षीय मुलगी दुर्गा आणि तीन वर्षीय मुलगा दुर्गेश यांच्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुर पाटील आणि सासू वेनुबाई चतुर पाटील या तिघांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोनगीर पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

विवाहितेने केला होता प्रेमविवाह

दुसऱ्या घटनेत, प्रेमविवाह करून संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेच्या आयुष्याचा दुःखद अंत झाला आहे. पतीने केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून या विवाहितेने दोंडाईचा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---