Adv. Ujjwal Nikam : हिंदू दहशतवाद असल्याची चर्चा खरी आहे का? काय म्हणाले ॲड. उज्ज्वल निकम?

---Advertisement---

 

Adv. Ujjwal Nikam : गेल्या अनेक महिन्यांपासून देशात हिंदू दहशतवाद असल्याचा फेक नैरेटिव्ह पसरविला जात आहे, यावर सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam ) यांनी आपले मत केले आहे.

ते म्हणाले की ”कोणत्याही दहशतवाद्याला जात नसते; काही विघातक प्रवृत्ती देश एकसंध ठेवू इच्छित नाहीत, तेच असा खोटा प्रचार करतात. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो; कारण मी भाजपाचा नव्हे तर राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे.

मीडिया ट्रायलमुळे न्यायाधीशांवर परिणाम होत नाही. मात्र, भारताच्या न्यायव्यवस्थेत बदल करावा लागेल. त्यामुळे खटले अनेक वर्षे प्रलंबित राहणार नाहीत, असे मत निकम यांनी व्यक्त केले.

बौद्धिक महाकुंभचे आयोजन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज रोड, नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये शनिवारी (दि. ६) ‘व्हॉइस ऑफ विस्डम, माइंडस् ऑफ इन्फ्ल्युएन्स’ अंतर्गत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

हिंदू दहशतवाद असल्याची चर्चा खरी आहे का? असा प्रश्न ॲड. निकम यांना विचारण्यात आला. यावर सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam ) यांनी आपले मत केले आहे.

ते म्हणाले की ”कोणत्याही दहशतवाद्याला जात नसते; काही विघातक प्रवृत्ती देश एकसंध ठेवू इच्छित नाहीत, तेच असा खोटा प्रचार करतात. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो; कारण मी भाजपाचा नव्हे तर राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे. मीडिया ट्रायलमुळे न्यायाधीशांवर परिणाम होत नाही. मात्र, भारताच्या न्यायव्यवस्थेत बदल करावा लागेल. त्यामुळे खटले अनेक वर्षे प्रलंबित राहणार नाहीत, असे मत निकम यांनी व्यक्त केले.

न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढावा!

तसेच वेगवेगळ्या खटल्यांची यशस्वी गाथा ॲड. उज्ज्वल निकम यांनी कथन केली. २६/११ च्या खटल्यात अतिरेकी अजमल कसाबचा बदला घेऊन त्याला फासावर लटकविणे हेच लक्ष्य खटला लढविताना ठेवले नव्हते; तर भारताचा शत्रू कोण आहे, तो भारतात कशा दहशतवादी कारवाया करतोय, हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नव्हता; तर देशाशी केलेले युद्धच होते, ही बाजू न्यायालयात पटवून देता आली, असेही ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले. तसेच सामान्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढावा, असा आग्रह त्यांनी धरला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---