---Advertisement---
अंबरनाथ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होईल, असा दावा विरोधांकडून केला जात आहे. दरम्यान, ही योजना बंद होणार की सुरु राहणार? याचं खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच विविध जाहीर सभांमध्ये लाडक्या बहिणींना स्पष्ट संदेश दिला की माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. त्यांनी आश्वासन दिले की ही योजना लाडक्या बहिणींना सक्षम बनवत राहील. ते अंबरनाथ येथे आयोजित सभेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत देवभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही. आम्हाला पारदर्शक प्रशासन आणायचे आहे. आम्ही कोणत्याही गुंडांना एकत्र येऊ देणार नाही.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आम्ही अंबरनाथच्या लोकांसाठी १५ डब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करू. १० ते १५ मिनिटांत लोकल सेवा उपलब्ध होईल. अंबरनाथ आणि बदलापूरला लोकल प्रवासाची सवय झाली आहे. मीही लोकल ट्रेनने प्रवास केला आहे, पण आता मला त्याची सवय नाही.”
ते म्हणाले, “देवभाऊ जे काही बोलतात ते करतात. धरणे वर्षानुवर्षे अशीच आहेत. कोणीही शहराकडे फारसे लक्ष दिलेले नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून सिंचनावर लक्ष केंद्रित केले आहे. मी दोन धरणांची मागणी केली आहे.
मी एमएमआरडीएला सांगितले आहे की दोन्ही धरणे पूर्ण होतील आणि तीन वर्षांत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.” विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले, “निवडणुका आल्यावर आम्ही बोलणारे लोक नाही.” त्यांनी असेही म्हटले की एमएमआर प्रदेशात विकास कामे केली जातील.









