---Advertisement---
जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर नगर परिषदेचा निकाल अखेर हाती आला आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला असून, नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील यांचा 2561 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह सासरे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुक्ताईनगर नगर परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, मुक्ताईनगरच्या जनतेने खरी गुंडागिरी ही मतदानाच्या माध्यमातून नष्ट केली आहे.
आमदार एकनाथ खडसे व खडसे परिवार हे रावण वृत्तीचे आहेत. गड हा रावणाचा नसतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खडसे परिवारावर केली.
खरी भाजपा ही शिवसेनेसोबत…
ही लढाई खरी भारतीय जनता पार्टीसोबत नव्हती, खरी भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेसोबत कायम आहे. ”ये अंदर की बात है, ऊपर वाले भी हमारे साथ है” असे म्हणत जनतेने दिलेल्या निकालामुळे खरी घराणेशाही आता संपली आहे, असेही मत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
भाजपाकडून चिंतन बैठक
दरम्यान, पराभवानंतर रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक सुरू असल्याचे समोर आले आहे. सुरुवातील भाजपने आघाडी घेतली होती, मात्र प्रभावानंतर रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी तातडीने चिंतन बैठक घेतली जात आहे.








