जे. के. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एक दिवसीय बाल संस्कार शिबिर

---Advertisement---

 

जळगाव : रायसोनी नगर येथील जे. के. इंग्लिश मीडियम स्कूल येथे बालकांमध्ये संस्कार, शारीरिक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने एकदिवसीय निशुल्क बाल संस्कार शिबीर घेण्यात आले.

यावेळी योगा-प्राणायाम, लाठी-काठी प्रशिक्षण, मैदानी पारंपरिक खेळ, नृत्य व चित्रकलेचे सत्र घेण्यात आले. शिल्पा मांडे, पूनम रघुवीर तिवारी, मिस सोनिया व रुपाली देसाई यांनी विविध उपक्रमांचे मार्गदर्शन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आली. पूनम लक्ष्मीकांत तिवारी यांनी उपक्रमाचे आयोजन केले. ज्योती श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. भाजप जिल्हा वरिष्ठ आघाडीचे महेश कापुरे यांनी आयोजकांचे कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---