---Advertisement---

२४ तासांमध्ये आढळले कोरोनाचे १ हजार १३४ नवे रुग्ण, मोदींनी बोलावली तातडीची बैठक

---Advertisement---

Covid-19 in India News : गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोना विषाणूचा प्रभाव आता पुन्हा डोकंवर वाढताना दिसत आहे. या अनुषंगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन, मास्क लागणार का? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे १,१३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची सध्या आता ७,०२६ वर पोहोचली आहे. तर ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर (Recovery Rate) सध्या ९८.७९ टक्के आहे.  गेल्या २४ तासांत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ७,६७३ मात्रा देण्यात आल्या. तर देशात आत्तापर्यंत २२० कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment