---Advertisement---

सावधानता बाळगा : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे, पुन्हा..

---Advertisement---

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. दरम्यान, आज आणि उद्या दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असे  आवाहन खुळे यांनी केलं आहे.

 या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---