मुंबई : देशातील पहिली ९०० कोटींची ग्रीन फिल्ड गुंतवणूक रायगडमध्ये येणार आहे. यापूर्वी ही गुंतवणूक ७२० कोटींची होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. एक्झॉनमोबी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॉन्टे डॉब्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारतातील वाढत्या ल्युब्रिकंटची (वंगण) मागणी आहेच. भारतातील स्टील उत्पादन, सिमेंट, उत्खनन आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये सातत्याने वृद्धी होत आहे. औद्योगिक वाहनांची गरज लक्षात घेता ही गरज मोबिल्स ल्युब्रिकंट्सद्वारे भारतीतील फ्युएल इकोनॉमी सुसज्ज ठेवण्यासाठी आम्ही मोलाचा वाटा बजावण्यासाठी तयार आहोत.”, असेही ते म्हणाले.
देशातील पहिली नऊशे कोटींची ग्रीन फील्ड गुंतवणूक महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्हयामध्ये!
