---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. आज सकाळीच नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद हालचाल दिसून आली. नौदलाने या संशयास्पद बोटीची माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना दिली. ही बोट पाकिस्तानातन आली असून त्यावर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शंकाही व्यक्त केली जातेय.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईजवळील पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांना दिसून आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांना सदर घटनेबाबत सूचित करण्यात आलं. पालघरच्या समुद्रात ४२ नॉकिटल आत ही संशयास्पद हालचाल दिसून आली. मात्र अद्याप या बोटीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या बोटीवर काही पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जातोय.
मुंबईत झालेल्या 26-11 च्या हल्ल्यानंतर पोलिसांनी धसकाच घेतला आहे. या हल्ल्यातील दहशतवादीदेखील समुद्री मार्गाने आले होते. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्ट पाठवला जातो. आज पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळील या संशयास्पद बोटीनेही मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे.
---Advertisement---