---Advertisement---

दिलासादायक! खाद्यतेल झाले स्वस्त, किती टक्क्यांनी?

---Advertisement---

oil : महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलाच्या किमतीत घट झाली आहे. जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळतं आहे. विशेषतः यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

किती टक्क्यांनी घट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात मोहरीचे तेल १६५  ते १७० रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन १३५  ते१४० रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्या वर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील एका महिन्यात मोहरीचे तेल १० टक्के, सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव १४०-१४५ रुपयांवरून ११५-१२० रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात १३५-१४० रुपयांवरून ११५-१२० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी,दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी किमती कमी होण्यामागची ही सर्व कारणे समोर आली आहे.

 

दरम्यान, खाद्य तेलाचे दर स्वस्त होत असताना दुसरीकडे आता इंधन दरवाढीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन दिवसाला तब्बल १० लाख बॅरेलनं कमी करण्याता निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियानं म्हटलं आहे की, ते मे महिन्यापासून २०२३ अखेरपर्यंत तेल उत्पादनात दररोज पाच लाख बॅरलनं कपात करणार आहे. तसेच, सौदी अरेबियासह, इराणसारख्या इतर काही तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादनात एकूण १.१५ दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. तेल उत्पादक देशांनी उचललेल्या या पावलांमुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment