---Advertisement---

काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश?

---Advertisement---

Politics : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे गेल्या दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र आशिष देशमुख लवकरच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सूत्रानुसार, काँग्रेस नेते आशिष देशमुख लवकरच नागपुरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

हिंगणा मतदार संघामध्ये हा मेळावा घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदार संघातून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे. काँग्रेस क्षावर आणि पक्षातील नेत्यांवर वारंवार देशमुख टीका करत आहेत.

अशात त्यांच्यांवर कारवाईची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या संर्पकात आहेत. मागील काही दिवसांपुर्वी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे काय होत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---